Sunday, April 8, 2007

friendship

एक तरी मित्र असावा असा
जरी न बघता पुढे गेले तरी
मागुन आवाज देणारा
आपल्यासाठी हसणारा
वेळ आलीच तर अश्रुही पुसणारा
स्वतःच्या घासातला घास
आठवणीने काढुन ठेवणारा
वेळप्रसंगी आपल्या वेड्या मैत्रिणीची
समजुत काढणारा
वाकड पाउल पडताना
सावरणारा
यशाच्या शिखरावर
आपली पाठ थोपटणारा
सगळ्यांच्या घोळक्यात
आपणांस सैरभैर शोधणारा
आपल्या आठवणीने
आपण नसताना व्याकुळ होणारा
खरच! असा एक तरी जीवाभावाचा
मित्र हवा आपणांस मैत्रिण म्हणणारा
तू असाच आहेस...